
वेळणेश्वर : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४० तास कालावधीचा STAAD Pro आज्ञावलीवर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून प्रा.अनिकेत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा.जाधव यांनी स्ट्रक्चरल डिझाईन आणि विश्लेषण विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकामांमध्ये ज्ञानवृद्धी वाढवणे, उद्योगाच्या गरजांसाठी तयारी, संरचना विश्लेषण, वापरकर्ता-अनुकूल सॉफ्टवेअरचा अभ्यास यामध्ये प्रात्यक्षिक सह ज्ञान त्यांनी सामाईक केले. Staad Pro हे एक अत्यंत शक्तिशाली आणि वापरण्यास सुलभ आज्ञावली आहे, ज्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या पुढे ठेवतो. या कार्यशाळेत भाग घेणारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील चांगल्या नोकरी संधी मिळवू शकतात.
सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य प्रा.अविनाश पवार, स्थापत्य विभागाचे विभागप्रमुख प्रा.नंदकिशोर चौगुले, सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.










