
सावंतवाडी : शनैश्र्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल. सावंतवाडी येथे ८ फेब्रुवारी २०२५ रोजी ॲनिमल हॅंन्डलिंग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध फार्मसी महाविद्यालयांच्या १५० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
पुणे येथील ग्लोबल बायोरिसर्च सॉल्युशनचे ऑपारेशन मॅनेजर प्रणित काळे यांनी प्रथम सत्रात प्रशिक्षणार्थ्याना ॲनिमल हॅंन्डलिंग या विषयांवर मार्गदर्शन केले. पुढील सत्रात पी इ एस राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसी, फर्मागुडी पोंडा गोवा येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. मंगिरिष देशपांडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रशिक्षणार्थ्याना महाविद्यालयातील ॲनिमल हाऊसला भेट देवून अत्याधुनिक सुविधा विषयी महिती देण्यात आली. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या सहप्राद्यापिका सौ. सोनाली परब आणि सहप्राद्यापिका सौ. आर्य तानावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे , विभाग प्रमुख डॉ संदेश सोमनाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेच्या यशस्वीते बद्दल शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे आधारस्तंभ व माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.