
वैभववाडी : येथील बुद्ध विहार येथे संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ बेठक संपन्न झाली. विधानसभा सभेच्या या कार्यक्षेत्रामध्येच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या गावी कोणताही प्रसंग होतो कोणी आवाज देऊ कोणी हाक मारो वेळी यावेळी रात्री अपरात्री तिथे हमखास धावून जाणारे जे आपले ठराविक मंडळी आहेत त्यांच्यामध्ये संदेश पारकर आहेत.
हा कार्यकर्त्याच्या भूमिकेतून वावरणारा आपला मित्र आमदार व्हावा असं कोणाला वाटणार नाही, प्रत्येकालाच वाटतं आणि सुदैवाने उद्धव ठाकरे साहेबांनी तुमच्या मनातलं ओळखलं या विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनातलं ओळखलं आणि संदेश भाई परकर सारखा एक उत्साही उमेदवार या मतदार संघात कायापालट करणारा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती करतो असं आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं.
यावेळी उमेदवार संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा जिल्ह्याप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मंगेश लोके, नंदू शिंदे, स्वप्निल धुरी, विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..