शेतकरी केंद्रबिंदू मानून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं काम : मनिष दळवी

Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 14, 2022 15:25 PM
views 190  views

सिंधुदुर्गनगरी : ऊस पीक शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर तेथील कारखानदारीला आपण हात दिला पाहिजे. आपला केंद्रबिंदू हा शेतकरी आहे आणि आम्ही शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करतो. जिल्हा बँकेचे कारखान्यामधील फायनान्स मधलं जे यश आहे ते त्यामुळेच आहे. आम्ही पक्ष.. नेता कोण.. नेतृत्व कोणाचे आहे ते  न बघता तिथला उत्पादक किती अडचणीत आहे ते बघतो. शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर तेथील कारखानदारीला आपण हात दिला पाहिजे. त्यासाठी कायदा कानून बाजूला ठेवून कर्जाची परतफेड त्या शेतमालाच्या उत्पादित मालावर होणारी प्रक्रिया सारी यंत्रणा उभी करण्यास त्याला वेळेत फायनान्स उपलब्ध करून दिला पाहीजे व वेळेत पतपुरवठा केला तर त्याची प्रक्रिया वेळेत होईल. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस, तास त्याचा महत्त्वाचा असतो आणि यामध्ये आम्ही जर वेळ काढला तर त्याचे परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागतात. शेतकरी त्यात होरपळला जाऊ नये हे आमचं पतपुरवठ्याचं जिल्हा बँकेचे धोरण आहे. असं असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व इंटर ट्रेड प्रा. लि. लिज्ड दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी केले.               

      या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे अशोक जाधव, सचिव विजय मराठे तसेच प.स.चे माजी सभापती शांताराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष माळवीकर, प्रा.एन एस पाटील आदी मान्यवर तसेच शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.                        

       यावेळी बोलताना  मनिष दळवी म्हणाले ज्या कारखान्याला आम्ही कर्ज देतो तो कारखाना परतफेड चांगलं करणार असतो. मॅनेजमेंटमध्ये जर शिस्त असेल तर तेथे चांगले परिणाम भविष्यात पाहावयास मिळतात.आशिया खंडात दौलत साखर कारखान्याचा पूर्वी दबदबा होता तसाच पूर्वीचा नावलौकिक पुन्हा मिळेल.कारखानदारीत आर्थिक शिस्त महत्त्वाची असते. शेतकऱ्याचा उतारा वाढला पाहिजे,त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून विचार जो करतो त्यांना शेतकऱ्याचे आशीर्वाद मिळतात या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी, कारखानदारांच्या विश्वासावर विश्वासावर पतपुरवठा करावा लागणार आहे असे शेवटी मनीष दळवी म्हणाले.