
खेड : बेरोजगारी दूर करण्यासाठी कोकणात कृषी क्षेत्रात काम आवश्यक आहे. कोकणातील तरुणांच्या हाताला कृषी च्या माध्यमातून रोजगार देता येऊ शकतो या विचारातून शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणच्या कृषी क्षेत्राचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती ना.उदय सामंत यांनी येथे पत्रकारांसोबत बोलताना दिली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. स्वामी नाथन सभागृहात सोमवार दि.२२ रोजी राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि दापोली मतदार संघाचे आमदार श्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत विविध कृषी विषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सदरील मुद्द्यांवर हलगर्जी करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी ताकीद देखील यावेळी देण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम देखील उपस्थित होते. त्यांनी देखील मार्गदर्शन केले.