
कुडाळ : कुडाळ शहरातील तो धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. कुडाळ शहरातील जिजामाता चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. याच ठिकाणी एम. एन. जी. एल. कंपनीने बसवलेल्या गॅस चेंबरमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
याबाबत मंगळवारी कुडाळ शहरातील शिवप्रेमींनी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांचे लक्ष वेधत हा गॅस चेंबर या ठिकाणाहून हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. यावर नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा चेंबर लवकरात लवकर हटवण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यानुसार हा धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली असून प्राजक्ता शिरवलकर यांनी अवघ्या दोन दिवसात आपल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. याबाबत समस्त शिवप्रेमींनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, शिवप्रेमी रमा नाईक, श्री.पांगुळ आणि अधिकारी उपस्थित होते.










