
सावंतवाडी : सिंधु यंग चॅम्पियन रन मॅरोथॉन स्पर्धा सावंतवाडीत होत आहे. ७ वर्ष ते २१ वर्षांमधील ४ गटात ही स्पर्धा होणार आहे. मुलांना ॲथलेटिक्स, स्पर्धांची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी आम्ही राबवत आहोत अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित ही स्पर्धा होत असून विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. २८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ही स्पर्धा सुरू होणार आहे. राजवाडा येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी त्याचा समारोप होणार असून जास्तीत जास्त मुलांनी याच सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ओंकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर, भुषण बांदेलकर आदी उपस्थित होते.










