
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी येत्या रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालय येथे होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणीचा फेरीनिहाय आराखडा प्रसिद्ध केला असून उमेदवार आणि नागरिकांच्या माहितीसाठी तो जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असून प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. मतमोजणी प्रक्रिया एकूण ५ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या फेरीत प्रभाग १ ते ५ मधील अ, दुसऱ्या फेरीत ब, तिसऱ्या फेरीत प्रभाग २- क, चौथ्या फेरीत प्रभाग ५ ते १० मधील अ व पाचव्या फेरीत ब चा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.










