बाळासाहेबांच्या स्मारकाला हात लावल्यास सहन करणार नाही : बबन साळगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 16, 2024 08:36 AM
views 260  views

सावंतवाडी : स्व.बाळासाहेबांच्या स्मारकाला हात लावल्यास सहन केला जाणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे‌.   हिंदूहृदय सम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं आज कल्पवृक्षरुपी  जिवंत स्मारक सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणे कोंड धरणा वरती आहे. नवीन होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील फिल्टरेशन प्लांट च्या लाईन आऊटमध्ये हे स्मारक दिसत आहे.

प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढावा व हे स्मारक कसं वाचवता येईल ते बघावं. प्रशासनाने या स्मारकाला हात लावल्यास सहन केलेला जाणार नाही. या जिवंत स्मारकामध्ये अनेक शिवसैनिकांचा तसेच आमच्याही भावना गुंतलेले आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकाला हात लावल्यास तीव्र विरोध करू असा इशारा बबन साळगावकर यांनी दिला आहे.