
वेंगुर्ला : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्राम विकासाचा पाया म्हणून ग्रामपंचायत कार्यरत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सदस्यांसाठी 'गावाच्या विकासात महिलांची भूमिका वास्तव आणि अपेक्षा' या विषयावरती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली,वेंगुर्ले यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्यासाठीच्या निबंध लेखन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये एकूण ६४ स्पर्धक महिला सदस्यांनी सहभाग घेत आपले विचार मांडले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
प्रथम: समृध्दी संतोष कुडव (ग्रा.प.सागरतीर्थ), द्वितीय: रुपाली किरण प्रभुखानोलकर (ग्रा.प.खानोली), तृतीय: अनुराधा गंगाराम गावडे (ग्रा.प.कुणकेरी), उत्तेजनार्थ प्रथम: माधवी दत्तगुरु भोगण (ग्रा.प.माजगाव), उत्तेजनार्थ द्वितीय: अंकिता दत्ताराम सावंत (ग्रा.प.कुणकेरी),
विद्यमान ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी अशा प्रकारची निबंध लेखन स्पर्धा सर्वात प्रथम घेण्याचा मान वेताळ प्रतिष्ठान आणि कै. गणेश दाभोलकर मेस्त्री मंच ला लाभला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, चित्रफ्रेम, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे परीक्षण मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका शैलजा परुळकर आणि व्ही.पी. फार्मसी कॉलेज माडखोल, सावंतवाडी च्या शिक्षिका मिलन तिरोडकर यांनी केले.