राष्ट्रीय छावा संघटनेकडून महिला दिन उत्साहात...!

Edited by: विनायक गावस
Published on: March 08, 2024 08:05 AM
views 50  views

सावंतवाडी : राष्ट्रीय छावा संघटना आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्गच्यावतीन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आला.  अँड. निता सावंत कविटकर यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये जान्हवी राऊळ,रूपाली देसाई,साक्षी तळवणेकर, कोकणसाद LIVE च्या अँकर जुईली पांगम,साक्षी रामदुरकर, दर्शना राणे, सुमित्रा परब, रूक्मिणी परब,अनघा नार्वेकर,अबिधा शेख, निर्मला लठ्ठे,गीता पारधी, कृष्णाई भिसे, अंकिता माळकर, प्रतिमा माळकर यांना स्त्री नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.    

तसेच सावंतवाडी शाळा नंबर 4 अंगणवाडी मुलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी 3 क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक शिवांश संदिप पाटील लोकमान्य टिळक यांची वेशभूषा, द्वितीय क्रमांक वेद गौरेश नातू शिवाजीची वेशभूषा, तृतीय क्रमांक तेजल दिपक सावंत झाशीची राणी वेशभूषा हे ठरले. 

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मुलांचं कौतुक केलं. महिलांना उद्योग व्यवसाय या विषयावर माहिती दिली. जानवी राऊळ यांनी यावेळी संघटनेसाठी वीस खुर्च्या भेट म्हणून दिल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी संघटनेविषयी माहिती सांगितली. तर यतीन गावडे यांनी विश्वकर्मा योजनेची माहिती दिली व 50 फॉर्म भरून घेतले. यावेळी महिला निकीता परब संचिता गावडे, पुजा गावडे,सेजल पेडणेकर,संगीता पारधी,मानसी पाटील, अंकिता सावंत, मनीषा गावडे, सरिता भिसे,अक्षता कुडतरकर,आरोही गवस उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार निकीता परब यांनी मानले.