ग्रामपंचायत तळवडेच्यावतीने महिला दिन उत्साहात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 13, 2024 07:51 AM
views 222  views

देवगड : ग्रामपंचायत तळवडेच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तळवडे सरपंच गोपाळ रूमडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

याप्रसंगी तळवडे ग्रामसेवक गुणवंत पाटील, उपसरपंच भाग्यश्री धुरी, ग्रामपंचायत सदस्या माणसी माणगांवकर, भावना शिंगरे, सुजाता घाडी, पल्लवी झाजम, आरोग्य सेविका रिध्दी तावडे, प्राजक्ता भाटकर, किशोर तळवडेकर , जयेश जाधव , अंगणवाडी सेविका शोभा कुबडे, संगिता मुणगेकर, ललिता दुखंडे, श्रीमती साटम, तंटामुक्ती अध्यक्षा रिया अनभवणे , बचत गट प्रतिनिधी नंदीनी परब तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .

             यावेळी महिला दिनानिमित्त सरपंच  गोपाळ रुमडे, ग्रामपंचायत सदस्या  माणसी माणगांवकर, उपसरपंच भाग्यश्री धुरी आदींनी मार्गदर्शन करत महिला दिनांच्या शुभेच्छा दिल्या या नंतर हळदीकुंकु व त्यानंतर महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी फनी गेम स्पर्धा त्यामध्ये मेणबत्ती पेटवणे , टीकली लावणे व प्रश्नमंजुषा  स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक विदिशा खोत , द्वितीय क्रमांक रेश्मा लाड तर तृतीय क्रमांक पुजा धुरी हिने पटकावला . या स्पधेत ग्रामपंचायत सदस्या भावना शिगरे यांनी निवेदण केले .

      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक गुणवंत पाटील तर आभार उपसरपंच भाग्यश्री धुरी हिने मानले .