
दोडामार्ग : तळकट येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी तळकट ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमासाठी लाभलेल्या डॉ. गार्गी पेठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, उपसरपंच रमाकांत गवस, मान्यवर म्हणून लाभलेल्या कशाळीकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विवेक मळीक, शशिकांत राऊळ, पुर्वी सावंत, दिव्या राऊळ, पोलिस पाटील रामदास देसाई, ग्रामसेवक देविदास कुबल, महिला ग्रामसंघ अध्यक्ष रूचिरा मळीक, CRP संगीता लाबंर, अपर्णा सावंत उपस्थित होत्या.
या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी निबंध स्पर्धा, पुष्प गुच्छ बनविने स्पर्धा, पाककला स्पर्धा अशा स्पर्धा तसेच फनी गेम्स, डॉक्टर गार्गी पेठे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी निबंध स्पर्धेमध्ये अनुक्रमे स्नेहा सिध्येश देसाई प्रथम क्रमांक, ऋचा महाबळ, प्रज्ञा देसाई, द्वितीय क्रमांक (विभागुन) स्नेहा मळीक तृतीय क्रमांक. तसेच पाककलेमध्ये प्रथम क्रमांक समीक्षा राऊळ, द्वितीय क्रमांक लक्ष्मी डांगी, तृतीय क्रमांक भाग्यश्री देसाई तर पुष्प गुच्छ स्पर्धेत प्रथम क्रमांक भाग्यश्री देसाई द्वितीय क्रमांक पूर्वी सावंत तृतीय क्रमांक सुजाता राऊळ यांचे आले. या क्रमांक आलेल्या सर्व विजेत्यांना ग्रामपंचायतीमार्फत प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्यात आले तसेच स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
यानंतर डॉक्टर पेटे मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी महिलांना ताण घेऊ नका, शिळे अन्न खाऊ नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या अशा प्रकारचे खूप सुंदर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर महिलांचे फनी गेम्स आणि कर्मणुकीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले, व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांची आणि पुष्पगुच्छ यांची स्तुती केली. पुष्पगुच्छ हे महिलांनी घरी बनवले होते परंतु पुष्प गुच्छ खुपच सुंदर आणि आकर्षक होते, त्यामुळे महिलांचे सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंजनी जोशी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ सुनेत्रा नांगरे, संगीता लांबर, ममता सावंत, सुधीर जोशी, शिवप्रसाद नाटेकर, अमोल मळीक , प्रज्योत देसाई , बाळू देसाई इत्यादींनी महिनत घेतली.