अणसूर इथं महिलादिन उत्साहात

ग्रामपंचायतच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
Edited by:
Published on: March 13, 2025 16:34 PM
views 198  views

वेंगुर्ला : अणसुर ग्रामपंचायतच्या वतीने ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या महिलादिन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते व  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शशिकला गावडे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अणसूर -पाल हायस्कुल चे मुख्याध्यापक राजेश घाटवळ, अणसूर वरचे प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री. मळगावकर, शिक्षक श्री.सामंत, ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, सीमा गावडे, माजी अंगणवाडी सेविका शशिकला गावडे, शाळा शिक्षिका नलिनी राऊत, जेष्ठ नागरिक भास्कर शंभु गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेसाठी सूत्रसंचालन शीतल नाईक, आरती रेडकर, प्रियांका मिसाळ यांनी केले.  रांगोळी, चित्रकला व निबंध या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अणसूर पाल हायस्कुल चे मुख्याध्यापक राजेश घाटवळ, पाककला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कांचन राजेश गावडे यांनी काम पाहिले. 

यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात माऊली उत्पादक समूह, कुलस्वामिनी समूह, सायली सीताराम गावडे, सातेरी मंगल कार्यालय संचालक कांचन राजेश गावडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा स्पर्धेत अनुष्का आंनद राणे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर रोहिणी रवींद्र गावडे यांनी द्वितीय व अनुष्का अंकुश तेंडोलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच पाककला स्पर्धेत (चिकनपासून पदार्थ)  प्रथम प्रज्ञा प्रदीप मालवणकर, द्वितीय अनुष्का आंनद राणे, तृतीय इंदिरा रामचंद्र मालवणकर, उत्तेजनार्थ प्रथम तनिष्का शांताराम मालवणकर, उत्तेजनार्थ द्वितीय गौरी नीळकंठ गावडे क्रमांक पटकावले.

रांगोळी स्पर्धेत (विषय : माझी वसुंधरा)  प्रथम काजल तुकाराम गावडे, द्वितीय अनुष्का आंनद राणे, तृतीय रुचिता तुकाराम गावडे विजेत्या ठरल्या. संगीत खुर्ची (महिला) स्पर्धेत इंदिरा रामचंद्र मालवणकर यांनी प्रथम, वैशाली विजय गावडे यांनी द्वितीय तर अन्नपूर्णा बाबुराब गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावले. संगीत खुर्ची (युवती) स्पर्धेत दिव्या दिलीप मालवणकर यांनी प्रथम, श्रावणी संदीप गावडे यांनी द्वितीय तर तनिषा दिलीप गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावले. 

चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटात मानसी रामचंद्र देऊलकर यांनी प्रथम, तनया भास्कर गावडे यांनी द्वितीय व जयेश बाबुराव गावडे याने तृतीय क्रमांक पटकावला. तर लहान गटात दुर्वा चंद्रशेखर गावडे हिने प्रथम, प्रांजल वामन गावडे हिने द्वितीय तर हर्ष आंनद राणे याने तृतीय क्रमांक पटकावला. 

निबंध स्पर्धेत (विषय पर्यावरण जतन काळाची गरज) कनिष्का बाबुराव गावडे हिने प्रथम, तनया भास्कर गावडे हिने द्वितीय तर अनुष्का अंकुश तेंडोलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांचे अभिनंदन करुन, महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्याने ज्याने आर्थिक साहाय्य केले त्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य संयमी गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, सीमा गावडे यांनी यशस्वी पणे पार पाडले.