आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

Edited by:
Published on: December 23, 2025 16:39 PM
views 28  views

देवगड : देवगड तालुक्यातील आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई आयोजित १५  वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच रविवार दिनांक २१ डिसेंबरला रोजी सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत भांडुप येथील गीता हाॅलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सतीश कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक हेमंत कुबल आणि उद्योजक, समाज सेवक व गाबीत समाज समस्या निवारण मंचचे अध्यक्ष सुनिलभाऊ जोशी तसेच खवळे महागणपती अध्यक्ष सुर्यकांत खवळे आणि विशेष अतिथी म्हणून गणेश फडके अध्यक्ष- गाबीत समाज शाखा कांजूरभांडूप(पु.)उपस्थित होते. या प्रसंगी मंडळाचे संस्थापक धर्माजी पराडकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष व मान्यवर पाहूण्यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सम्मेलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी यांचे स्वागत व परिचय करून दील्यावर अजित पराडकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. प्रारंभी मयत झालेल्या ग्रामस्थांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर शालांत, उच्च माध्यमिक व वैद्यकीय पदवीधर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षांनी या कार्यक्रमागील उद्देश स्पष्ट करुन आपल्या ग्रामस्थांच्या मुलांनी सुद्धा युपीएससी एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी व्हायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर पाहूण्यांचा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर सर्व पाहूण्यानी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर  धर्माजी पराडकर यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ, देणगीदार, पाहुणे व पदाधिकारी यांचे आभार मानले. महीलांचे हळदीकुंकू समारंभ पार पडल्यानंतर ग्रामस्थ पुरूष, महीला आणि मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम धनंजय मुणगेकर आणि गुणाजी पोसम यांनी आपल्या खास शैलीत सादर केले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.