वूमेन्स कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनाच आयोजन

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2023 21:46 PM
views 164  views

सावंतवाडी : सेंटर फॉर एज्युकेशन, टेक्नॉलॉजि अँड हेल्थ, सावंतवाडी संचलित वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च या महिला विद्यालयामध्ये मंगळवार दि. ०८ मार्च २०२३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता जागतिक महिला दिन साजरा होणार आहे. महिला महाविद्यालयात फक्त विद्यार्थीनींसाठी बॅचलर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन - बी.सी.ए. हा १२ वी नंतरचा तीन वर्षांचा, महिलांसाठीचा रोजगार व व्यवसायाभिमुख, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो. महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीनी, पालक, प्राध्यापक आदींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.