वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज - रोटरी क्लबच्यावतीने महिला दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: March 13, 2024 08:23 AM
views 52  views

सावंतवाडी : सेंटर फॉर एज्युकेशन, टेकनॉलॉजि अँड हेल्थ संचालित वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च सावंतवाडी आणि रोटरी क्लब सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सेंटर फॉर एज्युकेशन, टेकनॉलॉजि अँड हेल्थ संचालित वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च सावंतवाडी, RPD कॉलेज कॅम्पस सावंतवाडी येथे रोटरी क्लब सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने हा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री‌ सातोसकर, सचिव प्रवीण परब, डॉ. विनया बाड, सौ. नाईक, श्री. भागवत आदी सदस्य आणि वूमेन्स कॉलेज संस्था अध्यक्ष संतोष सावंत, सचिव सौ. सावंत, जेष्ठ सल्लागार काका मांजरेकर, प्राचार्या सौ. माळकर, प्रा. संतोष ठाकर, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी श्री. सातोस्कर यांनी सामाजिक कार्याचे महत्व, तर डॉ. बाड यांनी आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन केले. रोटरी क्लब तर्फे कॉलेज ग्रंथालयाकरिता दोन पुस्तके तसेच विद्यार्थिनींकरिता आरोग्यविषयक वस्तूंचे वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींना आरोग्य, सामाजिक कार्य याबाबत जाणीव करून देत शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आसिया सांगावकर आणि आभार प्रदर्शन प्राचार्या सौ. माळकर यांनी केले.