
वैभववाडी : अथायु युरो केअर कोल्हापुर,तालुका बौध्दसेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ जानेवारीला येथील आंबेडकर भवन येथे मोफत मुत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मुत्र विकार निदान झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया महात्मा फुले व आयुष्यमान भारत योजनेतुन केली जाणार आहे. ज्या रूग्णांना मुत्रविकार आहेत.त्यांची तपासणी या शिबीरात करण्यात येणार आहे. त्यानतंर त्यांच्यावरील शस्त्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. शिबीरामध्ये सहभागी होणाऱ्या रूग्णांनी रेशनकार्ड, आधारकार्ड, जुने रिपोर्ट, घेवुन यावे असे आवाहन अथायु युरो केअर सेंटर कोल्हापुरच्यावतीने करण्यात आले आहे.










