सेंद्रिय शेतीसाठी योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार

Edited by:
Published on: March 09, 2025 14:43 PM
views 190  views

सावंतवाडी :  माडखोल टेमवाडी येथे महिला दिनानिमित्त आर.के ड्रीमलँड पॅराडाईज माडखोल सावंतवाडी मार्फत व दत्त गुरु महिला बचत गट माडखोल सावंतवाडी यांच्या सहकार्याने  सेंद्रिय शेती विनोदनी ऑर्गॅनिक फार्मचे उद्घाटन व सेंद्रिय शेतीसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी सहदेव राऊळ यांनी यावेळी सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेती शेतीपुरवक व्यवसाय व  निसर्गोपचार आपल्या भारतीय प्राचीन नैसर्गिक पद्धतीचा प्रचार प्रसार व पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत निर्माण व्हावा हा हेतू यामागे आहे. निसर्ग हाच आपला डॉक्टर व आहार हेच आपले औषध असून कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पनेतून उपलब्ध करून देणार आहोत असे समीर रत्नाकर कुडतरकर यांनी सांगितले आहे.सरपंच श्रृष्णवी राऊळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा देताना आपलं व ग्रामपंचायतीच सहकार्य सेंद्रीय शेतीसाठी राहील असे आश्वस्त केल.

दरम्यान, महिला दिनाच औचित्य साधून यावेळी सेंद्रिय शेतीसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माडखोल सरपंच श्रृष्णवी राऊळ, कृषी सहाय्यक सहदेव राऊळ, वैशाली आडेलकर, वनिता राऊळ, पूर्वी राऊळ, समीर कुडतरकर, योगिता कुडतरकर, विनोदीनी कुडतरकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन शिवाजी दळवी तर आभार योगिता कुडतरकर यांनी मानले.