
सावंतवाडी : सेंद्रिय शेती शेतीपुरवक व्यवसाय व निसर्गोपचार आपल्या भारतीय प्राचीन नैसर्गिक पद्धतीचा प्रचार प्रसार व पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत निर्माण व्हावा हा हेतू आहे. या हेतूनं महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य गाव माडखोल टेमवाडी येथे उद्या ठीक ५ वा. महिला दिनानिमित्त आर.के ड्रीमलँड पॅराडाईज माडखोल सावंतवाडी मार्फत व दत्त गुरु महिला बचत गट माडखोल सावंतवाडी यांच्या सहकार्याने सेंद्रिय शेती उद्घाटन व सेंद्रिय शेतीसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. निसर्ग हाच आपला डॉक्टर व आहार हेच आपले औषध असून कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पनेतून उपलब्ध करून देणार आहोत. सेंद्रिय शेती उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन समीर रत्नाकर कुडतरकर यांनी केले आहे.