महिलांनी शासनाच्या सारथी योजनेचा लाभ घ्यावा..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 13, 2023 17:01 PM
views 157  views

सावंतवाडी : सेंटर फॉर एज्युकेशन, टेक्नॉलॉजि अँड हेल्थ सावंतवाडी संचालित वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च सावंतवाडी या महिला महाविद्यालयामध्ये BCA च्या  विद्यार्थीनींसाठी शासनाच्या सारथी या मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण विषयक योजनांची माहिती तसेच IT क्षेत्रातील विविध संधी व अद्ययावत माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षण-प्रशिक्षण हे अनिवार्य असून विद्यार्थिनी व महिला वर्गाला याची सर्वात जास्त गरज कशी आहे याची माहिती प्रोजेक्टर व थेट संवाद अशा प्रकारे या कार्यक्रमातून देण्यात आली. 

शासन सध्या राबवित असलेल्या सारथी या योजनेचा लाभ मराठा व कुणबी सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांनी घेणे तसेच त्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नसून या मोफत योजनेत किमान चार कॉम्प्युटरविषयक कौशल्ये प्राप्त करता येणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन व माहितीपर संभाषण हे माया एंटरप्रायजेस सावंतवाडीचे हर्षद चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. तसेच महाविद्यालयातर्फे अध्यक्ष संतोष वि. सावंत ,संस्था समिती व  प्र. प्राचार्या सौ. मीनाक्षी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास महिला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व अन्य कर्मचारी, BCA च्या  विद्यार्थिनी  तसेच RPD कॉलेज सावंतवाडी यांचे सहकार्य लाभले.