महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योग उभारावेत : यशवंत गव्हाणे

मळगाव येथे महिला मेळावयाचे आयोजन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 22, 2023 15:57 PM
views 220  views

सावंतवाडी : महिलांनी स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी लहान लहान अन्न व फळभाज्या प्रक्रिया उद्योग उभारावेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेचे अनुदान उपलब्ध असून या योजनेचा लाभ घेत आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन सावंतवाडीचे आदर्श कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांनी केले.

मळगाव - कुंभार्ली जीवन ग्रामसंघ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना गव्हाणे बोलत होते.

यावेळी जीवन ग्रामसंघाच्या अध्यक्षा स्नेहल हरमलकर, ग्रामसंघ सचिव शोभा मेस्त्री, कोषाध्यक्षा विजया गावडे, प्रभाग समन्वयक सचिन नाईक, प्रभागसंघ व्यवस्थापक रुपाली गुडेकर यांच्यासह या प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या - या मेळाव्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी इत्यादी पौष्टिक तृणधान्याचे जीवनातील च जेवणातील महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पीक उत्पादन वाढ व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी परीक्षण करून खतवापर करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.