
सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा 'नारीशक्ती' पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक माधुरी अनिल मुळीक, ॲड. अंजली अमित कुडतरकर, ॲड. अनघा अनिल निरवडेकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रेया सुधीर आडीवरेकर, नगरसेविका ॲड. सायली काशिनाथ दुभाषी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. निकिता नारायण सावंत आदी उपस्थित होत्या.
यावेळी महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर कसे उभे राहावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वावलंबी कसे बनावे, याबद्दल मार्गदर्शन करत सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे समाजासाठी झटणाऱ्या महिलांना 'नारीशक्ती पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. यात सुरेखा गणपती दळवी, लक्ष्मी लक्ष्मण माळकर, अनिता अशोक मठकर, लक्ष्मी विष्णू काळसेकर, विलासिनी नाईक, सावित्री तानाजी माळकर तसेच MCED काथ्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली आणि 'सामाजिक बांधिलकी ग्रुप'च्या महिलांचाही नारीशक्ती पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष संतोष तळवणेकर सहसचिव कल्याण कदम, जिल्हा प्रवक्ते डॉ. रमाकांत गावडे, महिला जिल्हाध्यक्ष अंकिता माळकर, पूजा सोनसुरकर, गजेंद्र कोठावळे, प्राजक्ता मोरजकर, संचिता गावडे, सेजल पेडणेकर, सौ. अक्षता कुडतरकर, सौ. दीप्ती कोरगावकर, सौ. सुनीता भाईप, सौ. सुहासिनी शेट्ये, सौ. अश्विनी कुडतरकर, सौ. दिशा राऊळ, सौ. विजया चव्हाण, सौ. शीतल माळकर, श्रीमती प्रतिमा माळकर, सौ. सुवर्णा माळकर, सौ. लक्ष्मी माळकर आणि श्री. दिनेश राऊळ उपस्थित होते.










