
सावंतवाडी : शिवसेनेचे फायर ब्रॅण्ड आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे निलेश राणे यांच्या उपस्थितीत या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. परब म्हणाले, १५ ते १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. भर्तरी पिंगळा, व्यंकट रमणा जय गोविंदा, जिव्हेश्वर आदी ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून फळ वाटप, धान्य वाटप, गरजूंना मदत तसेच माजी नगरसेवक गुरू मठकर यांच्या माध्यमातून सायकल वाटप आदी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तिनं दिवस सावंतवाडीत होणाऱ्या नाट्य महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा असं आवाहन श्री. परब यांनी केल आहे. याप्रसंगी शिवसेना नेते अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, सुधा कवठणकर, झेवियर फर्नांडिस, क्लेटस फर्नांडिस, राकेश पवार आदी उपस्थित होते.










