
सावंतवाडी : तलावापाशी पुरुष व महिला प्रसाधनगृह तयार करण्यात यावे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत ओपन जीम सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख ॲड. राजू कासकर यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे
ते म्हणाले, शहारातील अनेक नागरिक तलावाकाठी सकाळ संध्याकाळी फेरफटका व चालण्यासाठी येतात. लहान मुले, महिला, वृद्ध यांचा सामावेश असतो त्यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात यावी. तसेच ओपन जीम झाल्यास प्रत्येक प्रभागातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल अशी मागणी त्यांनी केली आहे.










