माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयात महिलांचा सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: March 10, 2026 17:07 PM
views 24  views

सावंतवाडी : आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात जागतिक महिला दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ८ मार्च जागतिक महिला दिन आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय येथे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानाने  साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माऊली महिला मंडळ शिरोडाच्या रेखाताई गायकवाड होत्या . गायकवाड यांच्या  प्रमुख उपस्थितीत डॉक्टर कालिंदी रानभरे मानसिक आरोग्य तज्ञ कोल्हापूर ,संपदा ताई थोरात गोकुळ दूध संघाच्या सदस्य , म्हापण वृद्धाश्रमाच्या संचालिका सानिका तुळसकर, जि प सदस्य अपर्णा सातोसकर, पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे  यांचा शाल श्रीफळ ,फोटो फ्रेम , शुभेच्छा कार्ड देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी कार्यक्रमात माऊली महिला मंडळ शिरोडा पदाधिकारी व सदस्य, माऊली महिला मंडळाच्या सचिव स्मिता गायकवाड, श्रद्धा कदम सदस्य ,छाया शिवचरण सदस्य ,श्रीम कुडतरकर, माया रहाटे , वंदना करंबेळकर ,फेमिना फर्नांडिस मालवण ,विद्या नवाधे, माजी विद्यार्थी सुचिता कारुडेकर,पूजा धुरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून श्री शारदा देवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते माऊली महिला मंडळ,शिरोडा यांच्या वतीने सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी माऊली मतिमंद विद्यालयाच्या मुलांनी प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वच उपस्थित मान्यवरांनी रेखा गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण सर्वांनी त्यांना मदत करू, असे आश्वासन दिले.

तसेच शाळेला लागणारी मदत,मुलांच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ताईंच्या सामाजिक कार्यात हातभार लावूया असेही सांगितले. यावेळी शाळेच्या वतीने कर्तृत्वानं महिलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत रंगत आणली. कार्यक्रमाची प्रस्तावना अर्चना लोखंडे तर आभार सरोज चव्हाण यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश उकरंडे ,रूपा सावंत ,शाळेचे शिक्षक,कर्मचारी,महिलावर्ग विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.