
कणकवली : युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘संताजी जगनाडे चषक 2026’ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. 21 मार्च ते रविवार दि. 22 मार्च या कालावधीत कणकवली कॉलेजच्या पटांगणावर रंगणार आहे.
विजेत्या संघाला 20 हजार 26 रुपये, द्वितीय क्रमांकाच्या संघाला 10 हजार 26 रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघाला 5 हजार 26 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
तसेच स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व यष्टीरक्षक यांना स्मार्टवॉच व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मालिकावीर खेळाडूस सायकल व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू तेली समाजातील असणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी महेश डिचोलकर (अध्यक्ष) 7387362202, विशाल नेरकर (सचिव) 9403228842, चेतन फोंडेकर 9765018365 व विठ्ठल पेडणेकर 8623902428 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










