बांद्यात भाजपची स्वच्छता मोहीम

Edited by: विनायक गांवस
Published on: March 10, 2026 17:02 PM
views 27  views

सावंतवाडी : बांदा येथे बांदा ग्रामपंचायत व भाजपच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. परिसरात ही मोहीम राबविण्यात आल्यानं अस्वच्छ परिसर स्वच्छ झाले. 


बांदा ग्रामपंचायत व भाजपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला. स्वच्छतेचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी बांदा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, ग्रा.प. सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, सिद्धेश नाईक, महेश सावंत, अनूप महाजन, प्रशांत बांदेकर, आबा धरगलाकर सर्व रिक्षा चालक व कामगार आदी उपस्थित होते. श्री. कामत यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानत बांदा गाव, स्वछ गाव हा संदेश देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.