
बांदा:
प्रत्येक कुटुंबातील महिला जर निरोगी असेल तर ते संपूर्ण कुटुंब सुखी समधानी जीवन जगत. ज्या घरातील महिला आरोग्य दृष्ट्या सक्षम असेल तर तिच महिला आपल्या कुटुंबाची हक्काचा डॉक्टर बनून काळजी घेत असते, म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पडवे माजगावच्या सरपंच सौ नयना देसाई यांनी केलं.
महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग, स्थापित माहेर लोकसंचिलित साधन केंद्र सावंतवाडी,अंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प (नवतेजस्विनी) प्रेरणा ग्रामसंस्था व पडवे माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात त्या बोलत होत्या. या शिबिराला गावातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. देसाई, यांसह उपसरपंच प्रज्ञा देसाई, पोलीस पाटील अरविंद देसाई, गावप्रतिनिधी भक्ती दळवी, सहयोगिनी वनिता झोरे, आरोग्य सेविका मा. बांबुळकर , गटप्रवर्तक दिप्ती पवार , आरोग्य सेवक श्री. गवस, आरोग्य मित्र बिले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विनिता देसाई, दुर्वा देसाई, उज्वला देसाई, आशा स्वयंसेविका मा. अश्विनी देसाई, प्रेरणा ग्रामसंस्थेच्या अध्यक्षा उज्वला देसाई , उपाध्यक्ष शुभांगी देसाई, सचिव अश्विनी देसाई मॅडम, सीआरपी शामल मेस्त्री, 10 बचत गटातील सदस्य उपस्थित होते. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करुन इतनी शक्ती हमें देन दाता या प्रार्थनेने सुरवात करण्यात आली. सहयोगिनी वनिता झोरे यांनी सुत्रसंचालन व प्रास्ताविक केले त्यानंतर सरपंच नयना देसाई यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आरोग्य सेविका मा. बांबुळकर मॅडम यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. महिलांची हिमोग्लोबिन, शुगर, वजन, उंची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोग्य सेवक यांनीही मार्गदर्शन केले. गटप्रवर्तक दिप्ती पवार यांनी महिलांमध्ये होणारे आजार याविषयी मार्गदर्शन केले. सर्व बचत गटातील महिलांची 69 महिलांची तपासणी करण्यात आली. पहिल्यांदाच खास महिलांच्या आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर झाल्याने गावातील महिला वर्गाने समाधान व्यक्त केलं.