गढूळ पाण्यामुळे दोडामार्ग नगरपंचायतमध्ये महिलांचा आक्रोश...!

प्रशासन पदाधिकारी यांना विचारला जाब | अर्चना घारेंंचांंही सहभाग | नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या मध्यस्थीने वातावरण झालं शांत
Edited by: संदीप देसाई
Published on: October 10, 2023 20:54 PM
views 422  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात नगरपंचायत च्या नळ योजनेतून पुरविण्यात येणाऱ्या गढूळ पाणी प्रश्नी मंगळवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोकण प्रांत अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या सोबत राष्ट्रवादी व शिंदे गट सेना पदाधिकारी व महिला यांनी नगरपंचायतवर मोर्चा नेत प्रशासनाला जाब विचारला. गढूळ पाण्याच्या बॉटल मुख्याधिकारी यांच्या समक्ष नेत आपण हे पाणी पिऊन दाखवा लाखाचे बक्षीस देऊ अशी ऑफर शहर वसियाना स्वच्छ पाणी पुरवा अशी जोरदार मागणी सीईओ, नगराध्यक्ष यांच्याकडे केली.

मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी महिलांना गढूळ पाणी प्रश्नी चर्चा करणेचे आश्वासित केले होते. त्या पार्श्वभूमीवर  मंगळवारी नगरपंचायत कार्यालयात या आक्रमक महिला अर्चना घारे परब यांच्या सोबत नगरपंचायत मध्ये दाखल झाल्या त्यांनतर तब्बल दोन तास अधिकारी,पदाधिकारी व त्यांच्यात हंगामा झाला.  मुख्याधिकारी, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. पण नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी यावर अभ्यासपूर्ण बोलताना पाणी प्रश्न कसा सोडवता येईल यावर चर्चा केली. मुळात गढूळ पाणी पुरवठा परिस्थिती निर्माण कशी झाली?  यावर नगरपंचायत काय उपाययोजना करत आहे. याची कल्पना उपस्थितांना दिली. इतकचं नव्हे तर येत्या आठ दिवसांत दोडामार्गच्या जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल, यासाठी आपले कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचा शब्द दिला आहे.

दरम्यान  दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयात गढूळ पाणी प्रश्न चर्चेला गेलेल्या महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या नेत्या अर्चना घारे तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी पाठींबा देत नगरपंचायत कार्यालय येथे हजेरी लावली होती. दुपारी बारा ते दोन जवळपास दोन तास झालेल्या या चर्चेत मोठा हंगामा बघायला मिळाला. मुख्यधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या समक्ष महिला आक्रमक झाल्या होत्या. यात काही ग्रामस्थांनीही सहभाग घेऊन आरोप करायला सुरुवात केली यामुळे गदारोळ आणखीन वाढला. आता उपाययोजना करता त्या अगोदर का झाल्या नाही. जर या अगोदर हे केले असते तर आज ही वेळ आली नसती असेही आक्रमक महिलांनी प्रशासन व पदाधिकारी यांना ठणकावून सांगितलं. मात्र आपण योग्य वेळी उपाययोजना करत आहोत. आता पाऊस ओसरल्याने काम करता येईल असही स्पष्टीकरण प्रशासनानं दिलं आहे.

चिखल गोळा झाल्याने पाणी गढूळ.. 

कसर्ई दोडामार्ग शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजनेची जी विहीर आहे.ती तिलारी नदीलगत आहे. गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत मोठा पाऊस झाला.  त्यामुळे नदीला पूर आला यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो विहिरीच्या ठिकाणी अडकून तो विहिरीच्या पाण्यात येऊ लागल्याने पाणी गढूळ झाले आहे. मुद्दाम पाणी गढूळ सोडले जात नाहीय, माझ्यासाठी एक वॉर्ड नाही तर हा प्रश्न संपूर्ण शहराचा आहे. म्हणूनच आम्ही सर्व मिळून यावर जबाबदारीनं काम करत आहोत, हे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पटवून दिले.

आता गाळ काढण्याचे काम सुरू झालं आहे. मात्र तरीही कामगार नेमून हा संपूर्ण गाळ येणार नाही. यासाठी गोवा येथील खास मशीनरी मागवली आहे. येत्या दोन तीन दिवसात काम सुरू केले जाईल. मग हा प्रश्न सुटणार आहे. शिवाय या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लाॅंट लवकरच सुरू करण्यासाठी पाणी शुद्ध देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे सांगितले.