
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच लोकार्पणा निमित्त उपस्थित असलेल्या माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेतून लावलेल्या स्टॉलला भेट दिली. या स्टॉलवरील सावंतवाडीची ओळख असणारी 'लाकडी खेळणी' पाहून राणे, चव्हाण यांनी त्या महिलांच कौतुक केले.
लाकडी खेळण्यांबद्दल विचारणा करत माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी योजनेतून सुरू असलेल्या अन्य उपक्रमांची चौकशी केली व शुभेच्छा दिल्या. तर पालकांनी रविंद्र चव्हाण म्हणाले, 'लाकडी खेळणी' सावंतवाडीची ओळख आहे. आजच्या युगात ग्लोबल होण आवश्यक आहे अशा शब्दांत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप नेते महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, दिलीप गारप, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.