हरकुळ बुद्रुकमधील उबाठाच्या महिला कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Edited by: साहिल बागवे
Published on: November 03, 2024 19:04 PM
views 267  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुल बुद्रुक शेख वाडी येथील उबाठा गटाची आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण अशा महिला कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रभावित होऊन  भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हरकुळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली.गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करत्या महिला प्रतिनिधींनी सांगितले. उपस्थित आमदार नितेश राणे,यांच्या सोबत गोट्या सावंत, इम्रान शेख,राजू पेडणेकर, बुलंद पटेल, जाहीर खान आदि भाजप उपस्थित होते..