कळसुलीत खडी वाहतूक करणाऱ्या डंपर अपघातात महिला जखमी

डंपर चालकावर कारवाई करा,भाजपाच्या शिष्टमंडळाची पोलिसांकडे मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 17, 2022 21:46 PM
views 175  views

कणकवली : कळसुली येथील शिरवल फणस स्टॉप येथे आज सायंकाळी ४ वाजता मागून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात वनिता देसाई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे भरधाव डंपर चवणाऱ्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमडळाने कणकवली पोलिसांकडे केली आहे.

कळसुली येथील वनिता देसाई ही कणकवलीवरुन आपल्या घरी कळसुली येथे जात होत्या. शिरवल फणसस्टॉप दरम्यान मागाहून येणारा डंपर क्र. (केए ०१- एबी १६५८) या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला.त्यात सौ.वनिता देसाई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना कणकवली येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर डंपरचे कागदपत्र पहाता त्या गाडीचे इन्शुरन्स व अन्य कागदपत्र अपूर्ण होते. तरी अशा डंपर चालकांमुळे वेळोवेळी या मार्गावर अपघात होत असतात.  लोकांना जीव गमवावे लागतात. तरी योग्य ती दखल घेऊन सदर डंपर चालकांवर कारवाई करावी,असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजपाच्या अध्यक्ष अण्णा कोदे,कणकवली नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, भूषण सावंत,गणेश मठकर,नवराज झेमने,आत्माराम नार्वेकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.