चौकुळ इथं १०८ अॅम्ब्युलन्समध्ये महिलेची प्रसुती | जिल्ह्यातली २४० वी १०८ अॅॅम्ब्युलन्समध्ये झालेली प्रसुती

Edited by: विनायाक गावस
Published on: June 16, 2023 15:05 PM
views 216  views

सावंतवाडी : आंबोली चौकुळ येथे १०८ अॅम्ब्युलन्समध्ये एका महिलेची प्रसुती झाली. राज्यातील ही ३८ हजार ९१७ वी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४० वी १०८ अॅम्ब्युलन्समध्ये झालेली प्रसुती ठरली आहे. शुक्रवारी १६ जूनला पहाटे साडेचारच्या सुमारास चौकुळ येथे गर्भवती पेशंट आहे अशी माहिती मिळाली. या कॉल नुसार आंबोली 108 अॅम्ब्युलन्स चौकुळ बोरवाडीत पाठवण्यात आली. डॉक्टर व पायलट पेशंटच्या घरी   पोहचले असता पेशंट भारती पाटील (वय28 वर्ष) यांना खूपच प्रसूती वेदना होत होत्या. यावेळी  डॉ.प्रतीक्षा मुंडे यांनी १०८ मध्येच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. यात सहाय्यक अर्जुन राऊत यांनी मोलाची मदत केली. प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळ व आई ला सुखरूप प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली येथे सोपवण्यात आले. १०८ च्या माध्यमातून अॅम्ब्युलन्समध्ये झालेली ही २४० वी प्रसुती ठरली आहे. याबद्दल १०८ च्या जिल्ह्यातील टीमसह डिस्ट्रिक्ट हेड विनायक पाटील यांच कौतुक होत आहे.