दापोली : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतिने खून करणाऱ्या पत्नीला व तिच्या प्रियकराला दापोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आही.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथील निलेश दत्ताराम बाक्कर हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने १३ जानेवारी रोजी दापोली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून निलेश याचा तपास सुरु करण्यात आला होता. निलेश याची पत्नी ज्या हॉटेल मध्ये काम करत होती तेथून कामावरुन रात्री ११.३० वाजता घरी आली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होती.
पोलीसांना सांगीतलेली घरी येण्याची वेळ व प्रत्यक्षात कामावरून निघून गेल्याची वेळ यामध्ये तफावत दिसून आल्याने तसेच निलेशचा मोठा भाऊ दिनेश बाक्कर याने त्याचेकडे चौकशी दरम्यान वहिनी नेहा हिच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलीसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने व तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर (वय ४२) रा. पालगड, या दोघांनी संगनमताने तिचा पती निलेश बाक्कर यास हर्णे-बायपास येथील मोकळ्या जागेत घेऊन जाऊन त्यास दारू पाजून त्याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून ठार मारले व त्याचा मृतदेह चार-चाकी गाडीतून नेऊन पालगड-पाटील वाडी येथील रस्त्यालगतच्या विहिरीत त्याचे अंगावर चारचाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधून टाकला.
दापोली पोलिसांनी तिला बोलते केल्यावर तिने हि माहिती पोलीसाना दिल्यावर मृत निलेशचा मृतदेह पालगड येथील विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मंगेश चिंचघरकर याचा शोध दापोली पोलिसांनी घेतल्यावर तो दापोली बसस्थानकातील एका बसमध्ये दिसल्यावर दापोली पोलिसांनी त्याला काल रात्री अटक केली. दापोली पोलिसांनी संशयित नेहा निलेश बाक्कर ( वय ३२) व तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर यांचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश बाक्कर याचे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गिम्हवणे येथील स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनखाली दापोली पोलीस करत आहेत.