राज ठाकरेंच्या कोकणात आगमनाने मनसेत चैतन्य

उद्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 30, 2022 20:06 PM
views 203  views

सावंतवाडी :आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सावंतवाडी शहरात आगमन झाले. सावंतवाडीतील गवळी तिठा येथे त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, ऍड. अनिल कासकर,  शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, सचिव कौस्तुभ नाईक, उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस, लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, ऍड.राजू कासकर, अनिल केसरकर निलेश मुळीक, तिरोडा शाखाप्रमुख मनोज कांबळी, यांच्यासह असंख्य मनसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर राज ठाकरे यांनी सावंतवाडी मध्यवर्ती कार्यालय येथे भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. रात्री ते मळगाव मार्गे हॉटेल आराध्य येथे रवाना झाले असून उद्या सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.