
सावंतवाडी : माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सर्वस्तरातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छां दिल्या.याप्रसंगी माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, उदय नाईक, संतोष गांवस, पत्रकार सचिन रेडकर, सुधीर आडीवरेकर मित्रमंडळाचे सदस्य रितेश हावळ, सुमित वाडकर,परशुराम चलवाडी आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी फोनवरून संवाद साधत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील वाढदिनी शुभेच्छा दिल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य कार्यकर्ता ते आरोग्य व क्रीडा सभापती असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेला भाजपचा हा युवा चेहरा केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, आम नितेश राणे यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळखला जात़ो. आज वाढदिनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.