
मुंबई : संजय दिना पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन आ. वैभव नाईक यांचे भांडुप वासियांना आजच्या सभेत केले मुंबई भांडुप लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेवली आहे. यावेळी अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या सभा सुरू असताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी भांडुप येथे रॅलीत सहभागी होत प्रचार केला. तसेच यावेळी उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ भांडुप येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ईशान्य मुंबई मधील शिवसैनिकांना कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी संबोधित केले.
यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, नगरसेविका राखीताई जाधव यांच्या सहित महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.