निलेश राणे राष्ट्रवादीत आल्यास स्वागत करू : प्रवीण भोसले

एकानं आमदार, एकानं खासदार रहावं हा नारायण राणेंचा मुलांच्या बाबतीतला विचार
Edited by: विनायक गावस
Published on: October 25, 2023 15:13 PM
views 229  views

सावंतवाडी : निलेश राणे राष्ट्रवादीत आले शरद पवार यांनी त्यांना आशीर्वाद दिला तर निश्चित त्यांच स्वागत करू असं विधान माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रवीण भोसले यांनी केल आहे. तर निलेश राणे यांच्या राजकीय निवृत्तीच्या निर्णयातून नारायण राणे निश्चित मार्ग काढतील अस विधान त्यांनी केले.

ते म्हणाले, निलेश राणे हे राजकारणातून निवृत्त होतील अस वाटत नाही. त्यांनी निवृत्त होऊ देखील नये. एकदा समाजकार्यात राजकारणात मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेऊ नये अस आवाहन प्रविण भोसले यांनी केल. तर एकान आमदार, एकान खासदार रहाव हा नारायण राणे यांचा दोन्ही मुलांच्या बाबतीतला विचार होता. त्याप्रमाणे भाजप त्यांचा विचार करू शकत. परंतु, एकाच घरात किती उमेदवार द्यावे ? हा भाजपचा विचार असू शकतो.

नारायण राणे लोकसभेला उभे राहू शकतात. नितेश-निलेश आमदारकीला उभे राहू शकतात. त्यामुळे एकाच कुटुंबात तिन उमेदवार द्यायचे की काय करायच असा प्रश्न कदाचित भाजपात असेल. मात्र, यातून नारायण राणे निश्चित मार्ग काढतील अस विधान प्रविण भोसले यांनी केल आहे.