हवामान आधारित विमा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

खासदार विनायक राऊत यांचं नेमळेवासीयांना आश्वासन
Edited by: विनायक गांवस
Published on: December 27, 2022 19:21 PM
views 253  views

सावंतवाडी : नेमळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला आणि ग्रामपंचायत मध्ये विजय मिळवला, त्याचा आम्हाला आनंद झाला आहे. आता गावचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे, असे शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी सांगितले तर नेमळे गावातील विमाधारक बागायतदारांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हवामान आधारित विमा मिळावा म्हणून प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

 

नेमळे ग्रामपंचायतीवर पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेना सरपंच आणि आठ सदस्य मिळून एक हाती सत्ता नीवडून आल्याने शिवसेना खासदार विनायक राऊत यांची त्याच्या निवासस्थानी नेमळे गावातील शिवसैनिकानी भेट घेतली यावेळी खासदार विनायक राऊत यानी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी खास करुन शिवसेना तालुका प्रमुख तसेच  पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांचे खासदार राऊत यानी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

खासदार विनायक राऊत म्हणाले,तुमची जबाबदारी वाढली आहे. जनतेला विकास आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहावे. सरपंचांनी हवामान आधारित विमा योजना लागू करण्याचा प्रश्न पहिल्या भेटीत आणला आहे. तो सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मांडणार आहे तसेच तो प्रश्न हाताळून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.


यावेळी शिवसेना नवनिर्वाचीत नेमळे ग्रामपंचायत  सरपंचा सौ.दिपिका दिलीप भैरे ,सदस्य श्री . सखाराम शिवराम राऊळ , श्री .एकनाथ गंगाराम राऊळ, श्री .सिध्देश आनंद   नेमळेकर श्री ,सागर सदाशिव नेमळेकर सौ.,स्नेहाली सुभाष राऊळ,श्रीम.शितल गजानन नाणोसकर ,सौ,आरती शंकर राऊळ,सौ.संज्योता सावळाराम नेमळेकर , तसेच'शिवसैनिक चंद्रकांत गुडेकर,दिलीप भैरे,शामा करंगुटकर,लिलाधर राऊळ ,सागर राऊळ,रत्नकांत वेंगुर्लेकर,विक्रम पांगम,बाळा माडकर,सचिन मुळीक,गुरु राऊळ,सावळाराम नेमळेकर,बाळा गुडेकर,सुनिल मुळीक,विजय राऊळ, सौ संगिता मुळीक,सौ साक्षी राऊळ सौ रुपाली चव्हाण ,सदाशिव गुडेकर,तसेच नेमळे गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.