मालवण - पेंडूर जि. प. मतदार संघात भाजपचा राजीनाम्यांचा स्फोट

26 पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 20, 2026 12:38 PM
views 154  views

मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या 26 पदाधिकाऱ्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे.  दोन दिवसांपूर्वी ओरोस मंडल येथील भाजपा पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या 26 पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामें दिले आहेत.

राजीनामा दिलेल्यामध्ये जिल्हा परिषद प्रभारी पेंडूर सतीश अंकुश वाईरकर,  तालुका उपाध्यक्ष जगदीश सु. चव्हाण, तालुका सरचिटणीस मिलिंद मारुती चव्हाण, पेंडूर पंचायत समिती प्रभारी चंद्रशेखर आत्माराम फोडेकर, शक्ती केंद्रप्रमुख संदीप बाळकृष्ण सरमळकर, लक्ष्मण धोंडी माडये, महेश दिगंबर वाईरकर, सिताराम अर्जुन मिठबावकर, बूथ अध्यक्ष सत्यवान बाळकृष्ण पाटील, गणेश रमेश वाईरकर, रमेश संभाजी न्हिवतकर, रमेश विजय मासये, केशव सहदेव मुसळे, कमलाकर मधुकर आजगावकर, संदीप विनोद पावसकर, महादेव राजाराम दळवी, राजेंद्र रमाकांत दळवी, रमेश सहदेव बांदिवडेकर, बाळकृष्ण चिंतामणी प्रभू, संतोष वसंत देऊलकर, गिरीश साबजी दळवी, स्वप्निल श्रीहरी नाईक, दर्शन महेश परब, वराड अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अर्जुन वसंत तळगावकर, तळगाव पंचायत समिती प्रभारी संदेश अरुण चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख सुमित अरुण सावंत या 26 पदाधिकारी यांनी राजीनामा दिला आहे.