मातृत्व सुखासाठी मातांना सहकार्य करणार : डॉ. वर्षा पाटील

Edited by:
Published on: June 19, 2023 11:30 AM
views 155  views

दोडामार्ग : मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील परमोच्च क्षण आहे त्यासाठी प. पु. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या पुढाकारातुन सिद्धगिरी हॉस्पिटलने पुढाकार घेतला असून ज्यावेळी मातेच्या हाती सुदृढ बाळ येईल तेव्हा आम्हांला आनंद वाटेल. मातृत्व सुखासाठी मातांनी जे सहकार्य हवे ते आपण देऊ अशी ग्वाही सिद्धगिरी जननी आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे संचालक आणि विभागप्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी केले.

दोडामार्ग तालुक्यातील काडसिद्धेश्वर सांप्रदाय यांच्यावतीने आणि लोकनेते सुरेशभाई दळवी यांच्या सहयोगातून विलास हॉल येथे मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले यावेळी डॉ. पाटील यांच्यासमवेत गुरुबंधू एकनाथ गवस, लक्ष्मण कानडे, नारायण गवस, प्रदीप गवस, राकेश धरणे पत्रकार तुळशीदास नाईक, तेजस देसाई, शंकर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील यांनी आपण विदेशात शिक्षण घेऊन या भागात महिलांसाठी हे कार्य करण्यासाठी प. पु. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने आल्याचे सांगितले. शिवाय केवळ ट्रीटमेंट पुरते तुमच्याशी न राहता तुमच्या प्रत्येक अडचणीत आपण सोबत असेन असे त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले. शिबिराचे सूत्रसंचालन संजय गवस यांनी केले. प्रस्ताविक एकनाथ गवस तर आभार तेजस देसाई यांनी मानले. या शिबिराचा लाभ ९५ हुन अधिक जोडप्यांनी घेतला. शिबीर यशस्वी होण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या स्टापने सहकार्य केले.