
सावंतवाडी : एलएलबी तीन वर्षीय कोर्ससाठी सीईटी पोर्टलच्या माध्यमातू प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. 12 ऑगस्ट ही अंतिम मुदत पसंती क्रम कॉलेज साठी देण्यासाठी आहे. आत्तापर्यंत 163 महाविद्यालये सीईटी पोर्टलवर ऍप्रुव्हड लिस्ट मध्ये दिसत आहेत. तथापि एकही कॉलेज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून या लिस्ट मध्ये आलेले नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही कॉलेजचे नाव ऍप्रुव्हड यादीत नसल्यामुळे कोकणातील विद्यार्थी यावर्षी विधी शिक्षणापासून वंचित राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही कॉलेजचे नाव ऍप्रुव्हड यादीत नसल्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हा सर्वस्वी कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची भावना विद्यार्थ्यांमधून उमटत आहे. आपले गाव सोडून एल.एल.बी शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोल्हापूर, पुणे गाठावे लागणार आहे. ही आर्थिक जबरदस्ती कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीबाहेर आहे. यामध्ये संबंधितांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांची गैरसोय त्वरित दूर करून कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये कॉलेजना बीसीआय (बार कौन्सिल ऑफ इंडिया) मान्यता द्यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांमधून होत आहे.










