LIVE UPDATES

जि.प. मतदार संघातील शाळा दुरुस्तीची कामे प्राधान्याने मंजूर करा

जि.प सदस्य विक्रांत सावंत यांनी वेधले आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचे लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 12, 2026 12:34 PM
views 50  views

सावंतवाडी : जि.प.स्वनिधीतून शाळा दुरुस्ती कामांना मंजुरी मिळण्याबाबत जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी लक्ष वेधले. जि.प. मतदार संघातील शाळा दुरुस्तीची कामे प्राधान्याने मंजूर करण्याबाबतची मागणी त्यांनी केली आहे.

यात माजगाव हरसावंतवाडा जि. प. शाळा नंबर ३ छप्पर दुरुस्ती, खिडक्या दरवाजे दुरुस्त करणे, माजगाव नाईकवाडा महापुरुष वि‌द्यामंदिर ०४ लाईट फिटिंग दरवाजे व खिडक्या दुरुस्ती, जि.प.शाळा चराठे वझरवाडी शौचालय बांधकाम व दुरुस्ती, ओटवणे जि. प. शाळा नंबर ३ गवळीवाडी शाळा दुरुस्ती,  माजगाव आरोग्यवर्धिनी केंद्र स्नानगृह, शौचालय दरवाजा, खिडक्या दुरुस्ती, ओटवणे जिल्हा परिषद शाळा नंबर ४ दुरुस्त करण्यासह  सोनुर्ली जि.प.शाळा नंबर २ दुरुस्ती, सरमळे देऊळवाडी नंबर १ जि. प. शाळा दुरुस्ती, माजगाव जि. प. शाळा नंबर २ इमारतीचा स्लॅब दुरुस्तीसह ओटवणे जि.प. शाळा नंबर २ मांडवफातरवाडी छप्पर दुरुस्ती करण्याबाबत लक्ष वेधले आहे.