
वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुका भाजप मंडळ अध्यक्षपदी तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक विलास हडकर यांनी वेंगुर्ले भाजप कार्यालयात ही घोषणा करून पपू परब यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, मावळते वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर आदी उपस्थितीत होते. मिळालेल्या संधीचे सोने करून सर्वांना बरोबर घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजप एक नंबरचा पक्ष आहेच आणि हीच घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी पपू परब यांनी बोलताना व्यक्त केला.
वेंगुर्ले येथील भाजपा कार्यालयात वेंगुर्ले तालुका मंडळ अध्यक्ष निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर निरीक्षक श्री. हडकर यांनी भाजप पक्षाची मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रियेची माहिती सांगून तालुक्यातून पपू परब यांचे एकमेव नाव या पदासाठी आले. आणि ही निवड बिनविरोध केल्याचे सांगितले. पपू परब यांनी यापूर्वी परबवाडा गाव सरपंच, सरपंच संघटना अध्यक्ष, भाजप वेंगुर्ला तालुका सरचिटणीस अशी पदे भूषवली आहेत. भाजप संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या व पक्षाच्या एका सच्च्या कार्यकर्त्याला संघटनेचे तालुकाध्यक्ष पद भाजप मध्ये मिळते याचे हे उदाहरण आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित कार्य करणार असून वेंगुर्ला तालुक्यात भाजप आतापर्यंत १ नंबरचा पक्ष राहिला आहे आणि यापुढेही ही घोडदौड कायम राखणार असल्याचा विश्वास यावेळी पपू परब यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पपू परब यांच्या निवडीनंतर त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मावळते अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी आपल्याला तालुक्यात काम करताना जशी साथ दिली तशीच आणि त्याहीपेक्षा जास्त पप्पू परब यांना साथ द्यावी असे आवाहन केले.
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना मावळते अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी तालुक्यात उत्तम प्रकारे काम केले. याचप्रमाणे पपु परब या युवा चेहऱ्याला आता ही संधी मिळाली आहे. ग्रामीण भागात परब यांचे तळागाळात काम आहे. संघटनावाढीसाठी त्यांची तळमळ आपण जवळून पहिली आहे. त्यामुळे ते मिळालेल्या संधीचे निश्चितच सोने करतील असा विश्वास मनीष दळवी यांनी व्यक्त केला.
यावेळी मावळते तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी बोलताना सांगितले की, भाजप पक्ष संघटनेत तालुकाध्यक्ष म्हणून ३ वर्ष मिळतात पण मला सुदैवाने ५ वर्ष मिळाली या ५ वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्यात तालुक्यात भाजप पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला. याबाबत मला साथ दिलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे ते म्हणाले. यावेळी जि प माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ, भाजप तालुका उपाध्यक्ष ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, अजित नाईक, वसंत तांडेल, भूषण सारंग, लक्ष्मीकांत कर्पे, साईप्रसाद नाईक, हेमंत गावडे, दादा केळुसकर, मनवेल फर्नांडिस, श्रेया मयेकर, शितल अंगचेकर, संतोष गावडे, सत्यविजय गावडे, मयुरेश शिरोडकर, शैलेश जामदार, सोमनाथ टोमके, राजबा सावंत, नितीन चव्हाण, समीर कांबळी, श्यामसुंदर राय, विजय रेडकर, श्री. पाटील, पुंडलिक हळदणकर, मारुती दोडशनट्टी, संदीप देसाई, सायमन आल्मेडा, सुजाता देसाई, कावेरी गावडे, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.