गोवा कला अकादमीप्रमाणे मालवणी कला अकादमीसाठी पाठपुरावा करणार

युवा उद्योजक, भाजपचे युवा नेते विशाल परब यांची मोठी घोषणा
Edited by: भरत केसरकर
Published on: April 05, 2023 14:36 PM
views 212  views

कुडाळ :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर जागतिक मालवणी साहित्य संमेलन न भुतो न भविष्याती असा पुढच्या वर्षी आयोजन करणार असल्याची घोषणा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी केली. विशाल सेवा फाउंडेशनच्या पुढच्या कोणत्याही कार्यक्रमात मालवणी भाषेला एक आगळंवेगळं स्थान असेल. मालवणी रंगभुमी तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदान वाढवण्यासाठी गोवा येथील कला अकादमीप्रमाणे मालवणी कला अकादमी स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची घोषणा यावेळी विशाल परब यांनी केली. युवा उद्योजक विशाल परब यांनी कुडाळ मराठा समाज हाॅलमधील "मालवणी अवॉर्ड" 2023 च्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते.

कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे आयोजित केलेल्या रील्स मालवणी पुरस्कृत "मालवणी अवॉर्ड" 2023 च्या कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा देताना  युवा नेते तसेच विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब तर यावेळी विविध क्षेत्रातील कलाप्रेमी बाबल्या पिंटू, गंगावणे, विनायक राणे, साईनाथ जळवी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विशाल परब यांनी अजून एक घोषणा केली. मालवणी सोशल मिडिया कंटेट क्रिएटर्ससाठी फाउंडेशनच्या माध्यमातून आधुनिक तांत्रिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी विशाल परब यांनी केली. यावेळी विशाल परब यांचा सत्कार करण्यात आला.