
देवगड : शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध आहे. हिंदीची सक्ती फक्त महाराष्ट्रातच का ? हिंदीची सक्ती मनसे खपवून घेणार नाही शाळा महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास विद्यार्थ्यांनी आणि पालक यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तसेच विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्ती केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल असा इशारा मनसे विद्यार्थी सेना देवगड संपर्क अध्यक्ष दिनेश झोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.