कुडाळमध्ये वैभव नाईक यांना पराभूत करणार : अभिजीत अडसूळ

Edited by: भरत केसरकर
Published on: March 08, 2024 07:59 AM
views 789  views

कुडाळ : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली शिवसेना वाढवण्याचे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वचन दिले आहे शिवसेना मजबूत करण्यासाठी मी या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये फिरतोय. तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू; शिवाय कुडाळमध्ये वैभव नाईक यांना पराभूत करूच. याशिवाय आमचे सावंतवाडी, रत्नागिरी दापोली मतदार संघ शिवसेना एकहाती जिंकेल. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी उगाचच टिका करून बढाया मारू नयेत.असा टोला शिवसेनेचे सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर रात्री उशिरा ते कुडाळ येतील  शिवसेना कार्यालयात बोलत होते.

यावेळी युवासेनेचे यशवर्धन राणे, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर, कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर, मंगेश नानचे, रोहन करमळकर, अभिजीत येडगे, रत्नाकर जोशी, दर्शन इब्रामपूरकर, कौशल नाईक,अक्षय जाधव, केतन शिरोडकर, प्रणय माजगावकर, नितेश नार्वेकर, शुभम सुकी,योगीराज भर्तू,विघ्नेश कुडतरकर,सुमित आडेलकर,सुशील भिसे,गौरेश नार्वेकर यासह शिवसैनिक व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.