
सावंतवाडी : सामाजिक कार्यात कायम अग्रस्थानी राहून राजकारणात सक्रिय होण्याच्या आधीपासून जनेतची सेवा केली. राजकारणात जेव्हा जेव्हा संधी मिळाली ती जनतेची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. सर्वसामान्यांचे दुःख जाणून त्यांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कायमच पुढाकार घेतला. जनसामान्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून या पुढील काळात देखील मी असच काम करत राहील असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले. पंढरपूर दर्शनासाठी जाणाऱ्या सांगली ग्रामस्थांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सांगेली येथील वारकरी ग्रामस्थांना आषाढी एकादशीनिमित्त मोफत पंढरपूर वारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विशाल परब यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल दिलीप भालेकर, माजी जि. प.सदस्य पंढरीनाथ राऊळ, माजी उपसरपंच सांगेली वामन नार्वेकर, दीपक राऊळ, सुनील सावंत, सिताराम मांजरेकर, अमित राऊळ, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर, दिलीप नार्वेकर, सुनील राऊळ, बाळा राऊळ, अजय मिस्त्री, विजय गावडे, न्हानू राऊळ, बाबी चव्हाण, महेश सांगलेकर, प्रकाश रेडीज, शिवराम सावंत, सोमनाथ राऊळ, बापू रेडीज, संतोष सांगलेकर, सुरेश वांजीवले, अनिल राऊळ, गुरुप्रसाद राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.