
वैभववाडी : वाभवे -वैभववाडी नगरपंचायत सर्वसाधारण सभा // शहरातील काही गटारांची कामे अर्धवट स्थितीत आहेत // गटरांचा काही भाग खुला असल्याने अपघात होत आहेत // काही दिवसांपूर्वी बैल गटारात पडला होता // ही कामे संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावीत // गणपती विसर्जन घाटावर जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाकडून नादुरुस्त करण्यात आला आहे यावर नगरपंचायत काय कारवाई करणार का? नगरसेवक मनोज सावंत यांनी उपस्थित केले प्रश्न // शहरात अर्धवट स्थितीत काम ठेवलेल्या ठेकेदारांना नगरपंचायतीने नोटीस बजावली आहे // विलंब करणाऱ्या काहीं ठेकेदारांना दंडही करण्यात आला आहे // यापुढे अशा ठेकेदारांचा ठेका रद्द करण्यात येईल असे बांधकाम सभापती रणजित तावडे यांनी सभेत सांगितले // गणेश विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे // त्यांनी संबंधित रस्ता सुस्थितीत करून देण्याच मान्य केले असल्याचे संजय सावंत यांनी सांगितले // याबाबत संबंधित विभागाने लेखी पत्र दिल्याचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी सांगितले //